बकरी ईदनिमित्त केरळमध्ये सलग दोन दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर
तिरुवनंतपुरम, 24 मे (हिं.स.)।केरळ सरकारने बकरी ईदच्या निमित्ताने दोन दिवसांच्या सुट्टीची घोषणा केली आहे. यूडीएफ सरकारने २८ मे रोजीही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी तसेच सार्वजनिक उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांना पुढील आठवड्यात
बकरी ईदनिमित्त केरळमध्ये सलग दोन दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर


तिरुवनंतपुरम, 24 मे (हिं.स.)।केरळ सरकारने बकरी ईदच्या निमित्ताने दोन दिवसांच्या सुट्टीची घोषणा केली आहे. यूडीएफ सरकारने २८ मे रोजीही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी तसेच सार्वजनिक उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांना पुढील आठवड्यात सलग दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बकरी ईदसाठी २७ मे रोजी आधीच सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. अधिसूचनेत म्हटले आहे की, “राज्यात ईद-उल-अजहा (बकरी ईद) २८ मे रोजी साजरी केली जाणार असल्याने सरकारने गुरुवार, २८ मे २०२६ रोजीही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.” सरकारने स्पष्ट केले की, ही सुट्टी राज्यातील सर्व सरकारी कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक महाविद्यालये आणि इतर संस्थांना लागू असेल.

दरम्यान, गेल्या वर्षी बकरी ईदच्या सुट्टीवरून केरळमध्ये राजकीय वाद निर्माण झाला होता. सुरुवातीला ६ जून २०२५ रोजी बकरी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, नंतर सण ७ जून रोजी साजरा केला जाणार असल्याच्या माहितीनंतर सरकारने सुट्टीची तारीख बदलून ७ जून केली आणि ६ जून हा कामकाजाचा दिवस घोषित केला.

सरकारच्या या निर्णयावर इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) तसेच काही अन्य मुस्लिम संघटनांनी टीका केली होती. सरकार राज्यात सांप्रदायिक अजेंडा आणि फॅसिझम लागू करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर सरकारने ६ जून रोजीही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande