
बीड, 03 मे (हिं.स.)। सदगुरु किसन बाबा महाराज व गुरुवर्य शांती ब्रह्मा नवनाथ बाबा महाराज यांनी आपल्या हृदयामध्ये भगवंत साठविला आहे, त्या प्रमाणे भगवंत हृदयात साठवावा, असे प्रतिपादन कृष्णा महाराज राऊत यांनी केले.
क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे नवनाथ बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा महाराज राऊत यांचे कीर्तन झाले. कीर्तनात कृष्णा महाराज संत तुकाराम महाराज यांचा अभंग विवेचनात करताना महाराज म्हणाले की, माणसाने आपल्या हृदयामध्ये हरी, भगवंत साठवा जसा गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज व सगुरू किसान बाबा महाराज यांनी आपल्या हृदयामध्ये भगवंत साठविला आहे. जो मनुष्य आपल्या हृदयामध्ये हरी साठवतो त्याला पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये हेलफाटे घालावे लागत नाहीत. असे अभंग विवेचन करताना ह भ प कृष्ण महाराज यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. संत एकनाथ महाराजांच्या नंतर शांती ब्रह्म ही उपाधी फक्त दोन माणसाला शोभून दिसते एक कुरेकर बाबा व दुसरे श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील शांती ब्रह्मा नवनाथ बाबा महाराज असे भावना उद्गार कृष्ण महाराजांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis