कोल्हापूर : टोप येथील राज्यस्तरीय 'शिवप्रेमी राज्य गौरव पुरस्कार' पंजाबराव डख यांना
कोल्हापूर, 03 मे (हिं.स.)। टोप ता. हातकणंगले येथील शिवसेना प्रणित शिवप्रेमी ग्रुपच्यावतीने देण्यात येणारा 2026 चा राज्यस्तरीय ''शिवप्रेमी राज्य गौरव पुरस्कार'' सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार शिवजयंतीच्या न
हवामान अभ्यासक पंजाबराव डख


कोल्हापूर, 03 मे (हिं.स.)। टोप ता. हातकणंगले येथील शिवसेना प्रणित शिवप्रेमी ग्रुपच्यावतीने देण्यात येणारा 2026 चा राज्यस्तरीय 'शिवप्रेमी राज्य गौरव पुरस्कार' सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार शिवजयंतीच्या निमित्ताने ४ एप्रिल रोजी शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती शिवप्रेमी ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती सांगताना ते म्हणाले सन २००१ पासून सलग २५ वर्षे समाजासाठी राज्य स्तरावर काम करणाऱ्या मान्यवरांना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख, अभिनेत्री अलका कुबल, कुस्ती सम्राट युवराज पाटील, अभिनेते मकरंद अनासपुरे, माजी मंत्री रामदास कदम, कला दिग्दर्शक नितिन देसाई, पोपटराव पवार, साहित्यिक विश्वास पाटील, अभिनेते भाऊ कदम यांच्यासह अनेक मान्यवर या शिवप्रेमी राज्यस्तरीय पुरास्कराने सन्मानित झाले आहेत. 2026 चा हा पुरस्कार पंजाबराव डख यांना शिवसेना नेते अरुण दुधवडकर यांचे हस्ते, माजी आ. सत्यजित पाटील सरुडकर, जिल्हाप्रमुख नामदेव गिरी जि. प. सदस्य सोनाली सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. टोप कल्लेश्वर मंदिर परिसरात सोमवार दि.४ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वा. होणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande