अमरावती महानगरपालिका सीड बॉल तयार करणार
- बिया उपलब्ध करून देण्याचे अमरावतीकर नागरिकांना आवाहन अमरावती, 06 मे (हिं.स.) अमरावती शहर हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वनविण्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेकडून सीड बॉल तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत देशी वृक्
मनपा कर्मचाऱ्यांच्या दोन महिन्यांच्या वेतनाला ब्रेक जीएसटी ग्रँट अद्याप अप्राप्त ः कर्मचाऱ्यांमध्ये रोष


- बिया उपलब्ध करून देण्याचे अमरावतीकर नागरिकांना आवाहन

अमरावती, 06 मे (हिं.स.)

अमरावती शहर हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वनविण्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेकडून सीड बॉल तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत देशी वृक्षांच्या बियाण्यांपासून सीड बॉल तयार करून त्यांचे शहरातील मोकळ्या जागांमध्ये व परिसरात विसर्जन करण्यात येणार आहे, ज्यामुळे वृक्षसंवर्धनास चालना मिळेल व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. नागरिकांनी आपल्या परिसरातील उपलब्ध देशी वृक्षांची बियाणे (उदा. कडुलिंब, बाभूळ, आंबा, जांभूळ, करंज इ.) गोळा करून कस्तुरबा उद्यान नेहरू मैदान येथे ७ ते १९ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत आणून देण्याचे आवाहन अमरावती महानगरपालिकेने केले आहे. बियाणे स्वच्छ, कोरडी व रोगमुक्त असावीत. शक्यतो देशी व स्थानिक प्रजातींची बियाणेच जमा करावीत. बियाणे वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये /पॅकेटमध्ये व्यवस्थित पॅक करून त्यावर वृक्षाचे नाव नमूद करावे. नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी होईल व अमरावती शहर अधिक हिरवेगार करण्यास मदत होईल, असा विश्वास महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande