राज्यसभा आणि राज्य विधान परिषदा 2026 च्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
नामनिर्देशनपत्रे भरण्याचे काम सुरु नवी दिल्ली, 01 जून (हिं.स.)। भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) तीन राज्यांतील विधान परिषदांच्या (आमदारांतर्फे होणाऱ्या) द्वैवार्षिक पक्षीय आणि पोटनिवडणुकांसह राज्यसभेच्या 27 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आह
ECI Announced 2026 Elections Rajya Sabha State Legislative Councils


नामनिर्देशनपत्रे भरण्याचे काम सुरु

नवी दिल्ली, 01 जून (हिं.स.)। भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) तीन राज्यांतील विधान परिषदांच्या (आमदारांतर्फे होणाऱ्या) द्वैवार्षिक पक्षीय आणि पोटनिवडणुकांसह राज्यसभेच्या 27 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

कार्यक्रमाचे तपशील खाली दिले आहेत

भारत निवडणूक आयोगाने विविध राज्यांतील राज्यसभा आणि विधान परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये 10 राज्यांतील 24 राज्यसभा जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक होणार असून महाराष्ट्र, तमिळनाडू आणि ओदिशा येथे प्रत्येकी एका राज्यसभा जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. तसेच बिहारमध्ये 9 आणि कर्नाटकमध्ये 7 विधान परिषद जागांसाठी आमदारांमार्फत द्वैवार्षिक निवडणूक होणार असून बिहारमध्ये एका जागेसाठी पोटनिवडणूकही होईल. राज्यसभा द्वैवार्षिक निवडणुका आंध्रप्रदेश, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, मणिपूर, मेघालय, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक आणि मिझोरम या राज्यांमध्ये पार पडणार आहेत.

निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाबद्दल अधिसूचना जारी केली आहे आणि निवडणूक अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी (द्वैवार्षिक निवडणुका आणि पोटनिवडणुका या दोन्हींसाठी) यांची नेमणूक केली आहे. नेमणुकांचे तपशील भारतीय राजपत्र/राज्य राजपत्रात जाहीर करण्यात आले आहेत.

याबरोबरच दिनांक 01 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून, वर उल्लेख केलेल्या सर्व निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे भरायची सुरुवात झाली. अर्ज सादर करण्याची मुदत 08 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता संपेल. तर दिनांक 09 जून 2026 रोजी निवडणूक अधिकारी (आरओज) या सर्व निवडणुकांसाठी सादर झालेल्या अर्जांची छाननी करतील. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 11 जून 2026 आहे.

निवडणुका झाल्या तर त्यांचे मतदान दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत होईल आणि त्यानंतर दुपारी 5 वाजता या सर्व निवडणुकांसाठी मतमोजणी करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande