कर्नाटकात राज्यसभेच्या चार, विधान परिषदेच्या सात जागांसाठी 18 जूनला मतदान
बंगळुरू , 01 जून (हिं.स.) कर्नाटकमधील राज्यसभेच्या चार जागा आणि विधान परिषदेच्या (एमएलसी) सात जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, मतदान १८ जून रोजी राज्य विधानसभेच्या परिसरातील विधान
कर्नाटकात राज्यसभेच्या चार, विधान परिषदेच्या सात जागांसाठी 18 जूनला मतदान


बंगळुरू , 01 जून (हिं.स.) कर्नाटकमधील राज्यसभेच्या चार जागा आणि विधान परिषदेच्या (एमएलसी) सात जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, मतदान १८ जून रोजी राज्य विधानसभेच्या परिसरातील विधान सौध येथे होणार आहे. या निवडणुकांमध्ये कर्नाटक विधानसभेचे सदस्य आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

राज्यसभेच्या निवडणुका भाजपचे इरण्णा कडाडी आणि नारायण कोरगप्पा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा कार्यकाळ २५ जून रोजी संपुष्टात येत असल्यामुळे घेतल्या जात आहेत. तर विधान परिषदेच्या सात जागांसाठी निवडणूक त्या सदस्यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत असल्याने होत आहे. हे सदस्य आमदारांमार्फत निवडून आले होते. यामध्ये काँग्रेसचे गोविंद राजू, नसीर अहमद, टिप्पन्नप्पा आणि बी. के. हरिप्रसाद यांचा समावेश आहे. तसेच भाजपचे एन. नागराज (एमटीबी), प्रताप सिम्हा नायक आणि सुनील वाल्यापूर यांचाही कार्यकाळ संपत आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून आहे. अर्जांची छाननी ९ जून रोजी होणार असून, उमेदवारांना ११ जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान आणि मतमोजणी या दोन्ही प्रक्रिया १८ जून रोजी पार पडतील.

विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता, सत्ताधारी काँग्रेसला राज्यसभेच्या चारपैकी तीन जागा आणि विधान परिषदेच्या सातपैकी पाच जागा जिंकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, भाजप आणि जेडी(एस) आघाडी या निवडणुकांमध्ये संयुक्त उमेदवार उभे करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande