पंतप्रधान मोदी ५ जूनला गुजरात आणि दमण दौऱ्यावर
नवी दिल्ली , 01 जून (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ जून रोजी गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दमणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते सूरतमध्ये सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. तसेच दमणमध्ये
पंतप्रधान मोदी ५ जूनला गुजरात आणि दमण दौऱ्यावर


नवी दिल्ली , 01 जून (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ जून रोजी गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दमणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते सूरतमध्ये सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. तसेच दमणमध्ये नव्या नागरी विमानतळाचे आणि शासकीय रुग्णालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

सूरतचे जिल्हाधिकारी तेजस परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी सुमारे २.४५ वाजता सूरत येथे पोहोचतील. ते सर्वप्रथम हजीरा परिसरातील एका औद्योगिक प्रकल्पाला भेट देतील. त्यानंतर सूरत येथील इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात १८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सूरतमधील कार्यक्रमानंतर पंतप्रधान दमणला रवाना होतील. तेथे भारतीय तटरक्षक दलाच्या हवाई पट्टीलगत उभारण्यात आलेल्या नव्या नागरी विमानतळाचे उद्घाटन करतील. तसेच विमानतळाजवळील मारवड शासकीय रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील.

दमणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामी विवेकानंद मैदानावर आयोजित जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते केंद्रशासित प्रदेशातील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन आभासी माध्यमातून (व्हर्च्युअली) करतील.अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या प्रकल्पांमुळे प्रदेशातील पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि संपर्क व्यवस्था अधिक बळकट होईल. तसेच आर्थिक घडामोडींनाही चालना मिळून विकासाला गती मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande