
मुंबई, 01 जून (हिं.स.) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये भाजप केंद्रीय नेतृत्वाकडून 11 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवारांची नावंही जवळपास निश्चित असल्याची माहिती आहे.
भाजपच्या 11 उमेदवारांची यादी
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली - अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया - अविनाश ब्राह्मणकर
अमरावती - प्रवीण पोटे
सोलापूर - राजेंद्र राऊत
सांगली-सातारा - धैर्यशील कदम
अहिल्यानगर - प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना - सुहास शिरसाट
नांदेड - अमर राजूरकर
धाराशिव-बीड-लातूर - बसवराज पाटील
जळगाव - नंदकिशोर महाजन
नागपूर - राजीव पोतदार
शिवसेनेच्या 4 उमेदवारांची यादी
ठाणे - रवींद्र फाटक
नाशिक - नरेंद्र दराडे
परभणी-हिंगोली - सईद खान
यवतमाळ - दुष्यंत चतुर्वेदी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 उमेदवारांची यादी
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे
पुणे - विक्रम काकडे
विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून
मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
मतमोजणी- 22 जून
आधीचे आमदार कोण?-
सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप)
अहिल्यानगर : अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)
ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)
जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप)
सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)
नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)
यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी)
भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप)
अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)
धाराशिव-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप)
परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना)
छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना)
नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी