शिक्षण मंत्रालयाच्या इमारतीत आग लागली नाही, शिक्षण मंत्रालयाचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली, 01 जून (हिं.स.)नवी दिल्लीतील आयटीओ येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरच्या कॅम्पसमध्ये आग लागली. ही आग शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात लागल्याची माहित होती. पण सरकारने आता या प्रकरणी स्पष्टीकरण जारी केले आहे. शिक्षण मंत्रालयाने म्ह
शिक्षण मंत्रालयाच्या इमारतीत आग लागली नाही, शिक्षण मंत्रालयाचे स्पष्टीकरण


नवी दिल्ली, 01 जून (हिं.स.)नवी दिल्लीतील आयटीओ येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरच्या कॅम्पसमध्ये आग लागली. ही आग शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात लागल्याची माहित होती. पण सरकारने आता या प्रकरणी स्पष्टीकरण जारी केले आहे. शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, हा एसपीए कॅम्पस होता, जो नवी दिल्लीतील कर्तव्य भवन-२, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड येथे आहे.

शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे, शिक्षण मंत्रालय नवी दिल्लीतील कर्तव्य भवन-२, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड येथे आहे. तथापि, आग नवी दिल्लीतील आयटीओ येथे असलेल्या स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरच्या कॅम्पसमध्ये लागली. मंत्रालयाने पुढे म्हटले आहे, आगीबाबत कोणताही गैरसमज पसरू नये यासाठी हे स्पष्टीकरण दिले जात आहे. शिवाय, आग किरकोळ होती आणि ती त्वरित नियंत्रणात आणण्यात आली. कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही.

सोमवारी सकाळी दिल्लीच्या आयटीओ परिसरातील स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरच्या इमारतीला आग लागली. या घटनेमुळे सर्वत्र घबराट पसरली. माहिती मिळताच, अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.

आयटीओ येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. आग लागल्यानंतर लगेचच, आतील सर्वांना बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाला तात्काळ माहिती देण्यात आली. दिल्ली अग्निशमन सेवेला सकाळी ९:३७ वाजता या घटनेची माहिती मिळाली. तात्काळ कारवाई करत, सुमारे आठ वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली.प्राथमिक तपासात इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून धूर येत असल्याचे दिसून आले आहे. कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही.

या घटनेवरून काँग्रेस पक्षाने सरकारवर टीका केली आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, शिक्षण मंत्रालयातील आग अज्ञात आहे, पण खरी आग भाजपने आपल्या शिक्षण व्यवस्थेतील गैरकृत्यांद्वारे लावली आहे. भाजपने पेपरफुटी माफियांच्या माध्यमातून शिक्षणाला लुटीचा धंदा बनवले आहे. व्यापम घोटाळ्याने सुरू झालेल्या या प्रकरणाचा फटका आता सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना बसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande