अमरावती जिल्ह्यात ११ लाख २२ हजार पाठपुस्तके दाखल
अमरावती, 11 जून (हिं.स.)। जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानित शाळेत इयत्ता पहिली ते आठवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच दिवशी पाठपुस्तके, गणवेश देण्याचे निर्देश दिले आहेत. यात जिल्ह्यातील २ हजार ४१७ शाळेतील सु
जिल्ह्यात ११ लाख २२ हजार पाठपुस्तके दाखल


अमरावती, 11 जून (हिं.स.)। जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानित शाळेत इयत्ता पहिली ते आठवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच दिवशी पाठपुस्तके, गणवेश देण्याचे निर्देश दिले आहेत.

यात जिल्ह्यातील २ हजार ४१७ शाळेतील सुमारे १ लाख ७९ हजार ३८१ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सत्र २०२६-२७ करीता सुमारे ११ लाख २२ हजार ७२२ पुस्तकांचे संच मागणी नोंदविण्यात आली होती. यामध्ये इयत्ता पहिली तरे पाचवी करिता ५ लाख १८ हजार ८४९ तर इयत्ता सहावी ते आठवी मधील विद्यार्थ्यांसाठी ६ लाख ३ हजार ८३७ पुस्तकांचे संचाचा समावेश आहे. पहिल्या टप्यात ७५ टक्के पाठ्यपुस्तकांच्या संचाचा पुरवठा झाला असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. उर्वरित संचही लवकरच उपलब्ध होणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले. दरवर्षी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संख्या, शासकीय अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. त्यानुसार शैक्षणिक सत्र २०२६-२७ करीता जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली होती.

त्यानुसार शिक्षण विभागाला जिल्ह्यातील २ हजार ४१७ शाळेमधील सुमारे १ लाख ७९ हजार ३८१ विद्यार्थ्यांना ११ लाख २२ हजार ७२२ इतक्या पाठ्यपुस्तकांच्या संचाचे वाटप होणार आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यासाठी आता आठवडाभराचा अवधी शिल्लक आहे. त्यानुसार जिल्ह्यात बालभारतीकडून पहिल्या टप्प्यात ७५ टक्के पाठ्यपुस्तक संच दाखल झाले आहेत. उर्वरित संचही येत्या काही दिवसात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरण करण्याचे दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन सुरू केले जात असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande