नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर येथे होणाऱ्या आंदोलनास अभिजित दीपके येणार
लातूर, 11 जून (हिं.स.)। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरात आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनास येण्याचा होकार कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी दिल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी दिली. वैद्यकिय प्रवेशा करिता आवश्यक
अभिजित दिपके


लातूर, 11 जून (हिं.स.)।

नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरात आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनास येण्याचा होकार कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी दिल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी दिली.

वैद्यकिय प्रवेशा करिता आवश्यक असलेल्या नीट परीक्षेतील पेपर फुटीप्रकरणी नुकतेच दिल्ली येथील जंतरमंतरवर आंदोलन झाले. पुढील आंदोलन पुणे येथे होणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांची भेट घेतली. लातूर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करण्याचे दिपके यांना निमंत्रण देण्यात आले. पाटील यांच्या निमंत्रणाला दिपके यांनी होकार दिला आहे. लातूर येथे २० जूननंतर आंदोलन करण्यासाठी येणार असल्याचे अभिजित दिपके यांनी मान्य केले आहे.

लातूर येथे सदर पेपरफुटी प्रकरणी आंदोलन होत आहे. २० जूननंतर होणाऱ्या या आंदोलनाची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande