पंतप्रधानांच्या स्वास्थ्यासाठी भाजपकडून श्री काळाराम मंदिरात महाआरती
नाशिक, 11 जून (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व सलग १२ वर्षांहून अधिक काळ काम केले.या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वास्थ्यासाठी श्री काळाराम मंदिरात भाजपकडून महाआरती करण्यात आली. महाआरती सोहळ्याला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये
BJP performs Maha Aarti


नाशिक, 11 जून (हिं.स.)।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व सलग १२ वर्षांहून अधिक काळ काम केले.या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वास्थ्यासाठी श्री काळाराम मंदिरात भाजपकडून महाआरती करण्यात आली.

महाआरती सोहळ्याला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार राहुल ढिकले , महंत भक्तीचरणदास महाराज, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे उपस्थित होते. सर्व नेत्यांनी मंदिरात आरती करून पंतप्रधानांच्या हातुन देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली. उपाध्ये आणि भारती पवार यांना पंतप्रधान मोदी यांनी १२ वर्षात सामाजिक कार्य करत गोरगरीबांची सेवा केली. देश िवकासाच्या दिशेने मोठी झेप घेत आअसल्याचे सांिगतले. कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी चंद्रशेखर पंचाक्षरी, दिगंबर धुमाळ, योगाचार्य प्रज्ञा पाटील, रोहीणी नायडू, रोहीणी पिंगळे, भाटे यांच्यासंह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande