एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या सिक्युअर्ड रिडिमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या पब्लिक इश्यूची घोषणा
मुंबई, 11 जून (हिं.स.) - एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने (“ईएफएसएल”/ “कंपनी”) आज प्रत्येकी १,००० रूपयांच्‍या दर्शनी मूल्याच्या सिक्युअर्ड रिडिमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या (“एनसीडी”) पब्लिक इश्यूची घोषणा केली आहे. हा इश्यू १,५०० दशलक
एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड


मुंबई, 11 जून (हिं.स.) - एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने (“ईएफएसएल”/ “कंपनी”) आज प्रत्येकी १,००० रूपयांच्‍या दर्शनी मूल्याच्या सिक्युअर्ड रिडिमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या (“एनसीडी”) पब्लिक इश्यूची घोषणा केली आहे. हा इश्यू १,५०० दशलक्ष रूपयांपर्यंतच्या आधारभूत आकाराचा (“बेस इश्‍यू साइज”) आहे. यामध्ये १,५०० दशलक्ष रूपयांपर्यंतचा ग्रीन शू पर्याय उपलब्ध आहे, जो एकत्रितपणे ३,००० दशलक्ष रूपयांपर्यंत (“इश्‍यू लिमिट”) होतो.

या इश्यूमध्ये एनसीडींचे १० सिरीज समाविष्ट आहेत, ज्यांवर निश्चित कूपन मिळणार असून त्यांचा कालावधी २४ महिने, ३६ महिने, ६० महिने आणि १२० महिने असा असेल. यामध्ये वार्षिक, मासिक आणि एकत्रित व्याजाचे पर्याय उपलब्ध आहेत. एनसीडींवर मिळणारे प्रभावी वार्षिक व्याज उत्पन्न प्रति वर्ष ८.६४ टक्‍के ते १०.०० टक्‍क्‍यांदरम्यान आहे.

हा इश्यू सोमवार ८ जून २०२६ रोजी सुरू झाला असून शुक्रवार १९ जून २०२६ रोजी बंद होणार आहे.

या इश्यूच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या निधीपैकी किमान ७५ टक्‍के निधी कंपनीच्या विद्यमान कर्जाचे व्याज आणि मुद्दलाची परतफेड/पूर्व-परतफेड करण्यासाठी वापरला जाईल. उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे, पण हा वापर उभारलेल्या रक्कमेच्या २५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसावा; जे वेळोवेळी सुधारित केल्यानुसार सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू अँड लिस्टिंग ऑफ नॉन-कन्व्हर्टिबल सिक्युरिटीज) रेग्युलेशन्स, २०२१ (“सेबी एनसीएस रेग्‍युलेशन्‍स”)च्या नियमांचे पालन करेल.

या इश्यू अंतर्गत जारी करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या एनसीडीला “क्रिसिल ए+/स्‍टेबल” (स्‍टेबल दृष्टिकोनासह क्रिसिल ए प्लस रेटिंग) असे रेटिंग देण्यात आले आहे.

ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड, नुव्हामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि टिप्सन्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे लीड मॅनेजर्स आहेत. गुंतवणूकदारांना तरलता उपलब्ध करून देण्यासाठी हे एनसीडी बीएसई लिमिटेडवर सूचीबद्ध केले जातील.

नुव्हामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (मर्चंट बँकर्स) रेग्युलेशन्स, १९९२ च्‍या सुधारित नियमांनुसार (मर्चंट्स बँकर्स रेग्‍युलेशन्‍स) कंपनीची सहयोगी मानले गेले आहे. पुढे, मर्चंट बँकर्स रेग्युलेशन्सच्या नियम २१ए आणि नियम २१ए च्या स्पष्टीकरणातील तरतुदींचे पालन करून नुव्हामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड केवळ या इश्यूच्या मार्केटिंगमध्ये सामील असेल आणि सेबी एनसीएस रेग्‍युलेशन्‍सच्या नियम २५(३) नुसार, एनसीडी जारी करण्याच्या संदर्भात ड्यू डिलिजन्स सर्टिफिकेट जारी करणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande