
रत्नागिरी, 11 जून, (हिं.स.) | मराठीतील पहिले ज्ञानकोशकार कै. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या स्मरणार्थ ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर प्रथम साहित्य संमेलन येत्या १८ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे.
मराठीतील पहिला ज्ञानकोश डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत पूर्ण केला. त्यांचे समाजकार्य आणि साहित्य समाजापुढे वारंवार यायला हवे. त्या दृष्टीने संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
हे संमेलन सातारा येथे होईल. साताऱ्यातील लोकमंगल समूह शिक्षण संस्था आणि केतकर कुल महासभा या संस्थांनी संयुक्तपणे हे संमेलन आयोजित केले आहे. मराठीतील त्यांच्या योगदानाला आदरांजली व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संमेलन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य श्याम भुर्के भूषविणार आहेत. केतकर कुल महासभेचे अध्यक्ष प्रकाश केतकर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस स्वागताध्यक्ष आहेत. लोकमंगल हायस्कूल मध्ये संमेलन साजरे होणार असून १८ जून रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन, तर संध्याकाळी ५ वाजता सांगता होईल. संमेलनाचे प्रायोजकत्व आणि यजमानपद लोकमंगल समूह शिक्षण संस्थेने घेतले आहे.
संमेलनास शुल्क नाही. साहित्यप्रेमी, कलाप्रेमी, कथा-कादंबरी लेखक, कवी आणि वाचनप्रेमी सर्व साहित्य परिवाराने या संमलेनास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संमेलनात कविसंमेलनही होणार आहे. देशभक्ती, ज्ञानोपासना, समाजसेवा, स्त्री सन्मान, डॉक्टर केतकर यांचा जीवनपट या विषयावरील कविता तसेच इतर सामाजिक, अर्थविषयक विषयांवर विचार मांडता येतील. केतकर कुल समूहातील सर्व केतकर , जोशी-केतकर कुल बंधूभगिनी , तरुण, ज्येष्ठांनी साहित्य संमेलनात आणि या साहित्य आनंद सोहळ्यात सहभागी व्हावे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी आपली नावे १४ जून २०२६ पर्यंत केतकर कुल महासभा कार्यवाह मुकुंद केतकर (९३७६७१०७५५), माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ सल्लागार संजय केतकर (९२२६४४६०७७), मिलिंद केतकर (८६०५१२२०२९, ८०१०१५६०२५, ८८८८९६२५०७), ज्येष्ठ सल्लागार केतकर कुल भगिनी सौ. प्रतिमा केतकर (९९३०८७०८७३) यांच्याकडे आपले नाव, पत्ता आणि कार्यक्रमाचे स्वरूप कळवावे.
श्याम भुर्के, पुणे (९४२२०३३५००) आणि शिरीष चिटणीस, सातारा (७५८८८६५०५१) यांच्याशीसुद्धा संपर्क साधता येईल.
संमेलनाचे निमंत्रक असे :
प्रकाश केतकर – अध्यक्ष (+९१९८२२३१३८१३),
मुकुंद केतकर – कार्यवाह (+९१९३७६७१०७५५),
अजय केतकर – कोषाध्यक्ष (+९१९८१९२६५३४६), अनिल केतकर सदस्य (+९१९४२११४५६२८),
सौ. प्राजक्ती केतकर लेले (+९१९८५०१०३४५१),
सौ. सुवर्ण केतकर अभ्यंकर (+९१९४२३२१३०५२),
सल्लागार संजय केतकर (+९१ ९२२६४४६०७७),
सल्लागार सौ. प्रतिमा केतकर (+९१९९३०८७०८७३).
प्रकाश केतकर – अध्यक्ष ( +९१ ९८२२३१३८१३)
राजीव केतकर – उपाध्यक्ष ( +९१ ९७६९८०२६१०, +९१ ९३२२६५६६४६)
माजी अध्यक्ष आणि जेष्ठ सल्लागार श्री संजय केतकर ( +९१ ९२२६४४६०७७)
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी