सोलापूर - द्राक्ष पिकाच्या नुकसानीच्या तणावातून मोहोळमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर, 11 जून (हिं.स.) - मोहोळ तालुक्यातील यावली येथील शेतकरी संजय राजाराम राऊत (वय 26) यांनी द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाल्याने आलेल्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संजय राऊत यांच्या शेतातील द्राक्ष पिका
Hdltt


सोलापूर, 11 जून (हिं.स.) - मोहोळ तालुक्यातील यावली येथील शेतकरी संजय राजाराम राऊत (वय 26) यांनी द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाल्याने आलेल्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संजय राऊत यांच्या शेतातील द्राक्ष पिकाचे नैसर्गिक संकटामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. सोमवारी सकाळी सहा वाजण्यापूर्वी त्यांनी राहत्या घरी लोखंडी पाईपला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.

कुटुंबीयांनी त्यांना तातडीने मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी गणपत नागनाथ राऊत यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात खबर दिली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नाळे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande