“पोलीस खरे समाजरक्षक” — राहुल केंद्रे
लातूर, 11 जून (हिं.स.) । जनतेच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार न करता रात्रंदिवस कर्तव्य बजावणारा खरा योद्धा म्हणजे पोलीस होय. समाजात शांतता, सुव्यवस्था आणि कायद्याचे राज्य अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाचे योगदान अत्यंत मोलाचे आहे,” असे
राहुल केंद्रे


लातूर, 11 जून (हिं.स.) । जनतेच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार न करता रात्रंदिवस कर्तव्य बजावणारा खरा योद्धा म्हणजे पोलीस होय. समाजात शांतता, सुव्यवस्था आणि कायद्याचे राज्य अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाचे योगदान अत्यंत मोलाचे आहे,” असे प्रतिपादन राहुल केंद्रे यांनी केले.

उदगीर तालुक्यातील हेर येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक धनाजीराव गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

या कार्यक्रमास प्रा. विठ्ठलराव धाकणे, पंडितराव पाटील, सरपंच पंडित धागे, सरपंच संग्राम भालेराव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande