
सोलापूर, 11 जून (हिं.स.)।
महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी बार्शी येथील नगराध्यक्ष तेजस्विनी कथले आणि माजी नगरसेवक प्रशांत कथले यांनी मल्लिकार्जुन मंदिरात विशेष अभिषेक केला. यावेळी शंभू महादेवाच्या चरणी राजेंद्र राऊत यांच्या यशस्वी वाटचालीसाठी आणि विजयासाठी प्रार्थना करण्यात आली.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसह भाविकांच्या उपस्थितीत हा धार्मिक विधी पार पडला. महायुतीच्या उमेदवाराला जनतेचा आशीर्वाद लाभावा आणि मतदारसंघाच्या विकासाला गती मिळावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड