
नांदेड, 11 जून (हिं.स.) : महाराष्ट्र, गोवा तसेच दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव केंद्रशासित प्रदेशातील बीडी, सिनी, चुनखडी दगड, डोलोमाईट, लोह-मँगनीज आणि क्रोम धातू खाणीतील कामगारांच्या मुला-मुलींसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता शिष्यवृत्ती व आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे आर्थिक मदत देण्यात येणार आहे:
इयत्ता 1 ली ते 4 थी : वार्षिक ₹1,000
इयत्ता 5 वी ते 8 वी : ₹1,500
इयत्ता 9 वी ते 10 वी : ₹2,000
इयत्ता 11 वी व 12 वी : ₹3,000
आ
यटीआय, पॉलिटेक्निक, बीएससी व कृषी पदवी अभ्यासक्रम : ₹6,000
बीई, एमबीबीएस, एमबीए यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम : ₹25,000
अर्जासाठी
अंतिम मुदत
प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती अर्जाची अंतिम मुदत : 31 ऑगस्ट 2026
पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती अर्जाची अंतिम मुदत : 31 ऑक्टोबर 2026
पात्रता, अटी आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्पष्ट आणि वाचनीय स्कॅन प्रती अपलोड कराव्यात. अर्ज सादर केल्यानंतर संबंधित शैक्षणिक संस्थेकडून त्याची पडताळणी झाली आहे की नाही, याची खात्री विद्यार्थ्यांनी स्वतः करून घ्यावी.
मुदतीनंतर प्राप्त झालेले किंवा संस्थेमार्फत पडताळणी न झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्जासाठी महत्त्वाच्या अटी
प्रथमच अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) करणे आवश्यक आहे.
आधार कार्ड अनिवार्य
विद्यार्थ्याचे स्वतंत्र बँक खाते आवश्यक
संयुक्त खाते असल्यास विद्यार्थ्याचे नाव प्रथम असावे
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र खाते आवश्यक
बँक खाते आधारशी संलग्न असावे
विद्यार्थ्याचा स्वतंत्र मोबाईल क्रमांक असावा
बीडी कामगारांच्या ओळखपत्रावर आश्रित सदस्यांची नावे नमूद असणे आवश्यक आहे. तसेच सन 2025-26 चे उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
केंद्र किंवा राज्य शासनाकडून मिळणारी मेरिट-आधारित शिष्यवृत्ती मिळत असली तरी विद्यार्थी मंत्रालयाच्या कल्याणकारी शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात. मात्र, एकाच प्रकारातील दोन किंवा अधिक मेरिट-आधारित अथवा कल्याणकारी शिष्यवृत्तींचा लाभ एकाच वेळी घेता येणार नाही.
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेदरम्यान अडचण आल्यास नागपूर मुख्यालयाशी दूरध्वनीद्वारे किंवा ई-मेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जवळच्या श्रम कल्याण संघटनेच्या दवाखान्यातील प्रभारी वैद्यकीय अधिकारी किंवा क्षेत्रीय प्रभारी यांच्याकडूनही माहिती मिळू शकते.
ही माहिती शासकीय आयुर्वेदिक बीडी कामगार दवाखान्याचे वैद्य डॉ. रमेश डी. चामलवार यांनी दिली.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis