सर्व मतदारांना त्यांचे मतदान केंद्र कोठे आहे याची माहिती द्यावी  - निवडणूक निरीक्षक
सोलापूर, 11 जून, (हिं.स.)। महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 च्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व नोडल अधिकारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी. व ही निवडणूक अत्यंत शांतता
Hg xv j


सोलापूर, 11 जून, (हिं.स.)। महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 च्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व नोडल अधिकारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी. व ही निवडणूक अत्यंत शांततामय वातावरणात व यशस्वीपणे पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विधान परिषद निवडणूक स्थानिक प्राधिकरण मतदार संघ बाबत नियुक्त सर्व नोडल अधिकारी यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, उप जिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, समाज कल्याण सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे, अन्य धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या सह अन्य नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्तीकेयन म्हणाले की, या निवडणुकीसाठी प्रत्येक उपविभागीय अधिकारी स्तरावर मतदान केंद्र असणार आहेत. या सहा ठिकाणचे वेब कास्टिंग करण्यात येऊन त्याचा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात करावा. मतदान व मतमोजणी साठी आवश्यक असलेले साहित्य तयार ठेवावे. एफएसटी, व्हीएसटी व एसएसटी या टीमची स्थापना करून त्या अत्यंत कार्यक्षमपणे काम करतील यासाठी नियोजन करावे. सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण द्यावे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात कॉल सेंटर तयार करून ते ऍक्टिव्ह पणे काम करेल हे पहावे. त्याप्रमाणेच निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पोलीस विभागाने ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत त्या जमा करण्याची कारवाई तात्काळ पूर्ण करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने चेक पोस्टवर तपासणी मोहीम अत्यंत बारकाईने राबवावी. मतमोजणी झाल्यानंतर मत पेट्या ठेवण्यासाठीची स्ट्रॉंग रूम तयार करावी. मतदान केंद्रावर आरोग्य पथके नियुक्त करावीत. तसेच सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेले जबाबदारी परस्परात योग्य समन्वय ठेवून पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande