बीड शहरातील रस्ते विकासावर आ. संदीप क्षीरसागर यांची मुख्यमंत्र्यासोबत चर्चा
बीड, 11 जून (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट घेऊन बीड शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रस्ते विकासाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली. बीड शहरातून जाणाऱ्या सोलापूर–बीड–धुळे राष्ट्रीय महामार्
Q


बीड, 11 जून (हिं.स.)।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट घेऊन बीड शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रस्ते विकासाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली.

बीड शहरातून जाणाऱ्या सोलापूर–बीड–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणेसाठी केंद्रीय मार्ग निधी कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्याची मागणी यावेळी केली.

बीड शहरातील वाढती वाहतूक, नागरिकांची गैरसोय आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता या रस्त्याचे रुंदीकरण व आधुनिकीकरण अत्यंत आवश्यक आहे. हा मार्ग बीड शहराच्या विकासाचा, व्यापाराचा आणि दळणवळणाचा प्रमुख दुवा असल्याने या कामाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळणे गरजेचे आहे.

बीडकरांना चांगले रस्ते, सुरक्षित प्रवास आणि आधुनिक पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळवून विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्न कायम राहील. असे त्यांनी सांगितले

बीडच्या विकासासाठी आवश्यक असलेला प्रत्येक निधी आणि प्रत्येक प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande