चंद्रपूर : पीएम ई-बस स्टेशन व चार्जिंग सेंटरच्या कामाची आयुक्तांकडून पाहणी
चंद्रपूर, 12 जून (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश यांनी तुकूम येथील पीएम ई-बस स्टेशन व चार्जिंग सेंटर येथे भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी आयुक्तांनी सध्या सुरू असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी
चंद्रपूर : पीएम ई-बस स्टेशन व चार्जिंग सेंटरच्या कामाची आयुक्तांकडून पाहणी


चंद्रपूर, 12 जून (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश यांनी तुकूम येथील पीएम ई-बस स्टेशन व चार्जिंग सेंटर येथे भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.

यावेळी आयुक्तांनी सध्या सुरू असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून संबंधित कंत्राटदारांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कामाची गुणवत्ता उत्कृष्ट राखण्याबाबत निर्देश देत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिले.

याप्रसंगी उपआयुक्त शेषराव टाले , विद्युत विभागाच्या उपअभियंता प्रगती पुरे, शहर अभियंता रविंद्र हजारे, यांत्रिकी विभागाचे उपअभियंता रवींद्र कळंबे, संबंधित कंत्राटदार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पीएम ई-बस सेवा प्रकल्पाअंतर्गत चंद्रपूर शहरासाठी एकूण ५० वातानुकूलित इलेक्ट्रिक बस उपलब्ध होणार आहेत. या आधुनिक व पर्यावरणपूरक बससेवेमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित व सुविधायुक्त होणार असून सर्वसामान्य नागरिकांना आरामदायी व किफायतशीर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होऊन पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande