वसतिगृह प्रवेशासाठी ऊसतोड कामगारांच्या पाल्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, 13 जून (हिं.स.)। ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी समाज कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. समाज कल्याणच्यावतीने नांदेड जिल्ह्यात मुखेड व कंधार या तालुक्यातील संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिग
वसतिगृह प्रवेशासाठी ऊसतोड कामगारांच्या पाल्यांनी अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड, 13 जून (हिं.स.)।

ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी समाज कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. समाज कल्याणच्यावतीने नांदेड जिल्ह्यात मुखेड व कंधार या तालुक्यातील संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे. पात्र इच्छुक विद्यार्थ्यांनी किंवा ऊसतोड कामगाराच्या पाल्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी वसतिगृहास संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मुखेड व कंधार या तालुक्यात 100 क्षमतेची मुलांसाठी एकूण 2 वसतिगृहे सुरू करण्यात आले असून यामुळे दुर्गम भागातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर होणार आहे. प्रवेशीत सर्व विद्यार्थ्यांना निवास, भोजनाची व्यवस्था मोफत दिली जाईल. तसेच शालेय पुस्तके आणि स्टेशनरीचे विनामूल्य वाटप करण्यात येईल.

प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या दरमहा 500 रुपये भत्ता थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्याकरीता विद्यार्थ्यांचे आई-वडील अधिकृत ऊसतोड कामगार असणे आवश्यक आहे. चालू शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या पात्र विद्यार्थी मुखेड, कंधार या तालुक्यातील संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वस्तीगृहे या ठिकाणी थेट संपर्क साधून आपले अर्ज सादर करावेत, असेही आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

000000

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande