
नांदेड, 13 जून (हिं.स.)। महसूल विभागामार्फत देण्यात येणारे दाखले व इतर सेवा शासनाच्या विविध योजना बाबत शासन निर्णयानुसार व सेवांच्या प्रक्रियेचे सुलभीकरण Goverance Process Re-engineering (GPR) ,अंतर्गत कार्यवाही राबविणे व सुलभता आणणे बाबत नांदेड तालूक्यातील आपले सरकार सेतू चालक व ग्राम पंचायत आपले सरकार सेतू चालक तसेच प्रमाणपत्र संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त बैठक रोजी तहसिल कार्यालय नांदेड आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत नांदेडचे उपविभागिय अधिकारी डाॅ.सचिन खल्लाळ व तहसिलदार नांदेड संजय वारकड यांनी GPR अनुषंघाने शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात यावी व सेतू केंद्रांत दर्शनी भागात भाव फलक लावणे,ग्राम पंचायत सेतू केंद्रातून महसूलचे विविध दाखले सेवा देणे,अर्जदार यांना प्रमाणपत्र मुदतीत वितरण करणे अशा सुचना दिल्या.
यावेळी नायब तहसिलदार सुनिल माचेवाड,स्वप्निल दिगलवार,आपले सरकार सेतू जिल्हा समन्वयक केदार चोपडे व तालूक्यातील आपले सरकार सेतू चालक अदि उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis