अमरावती - विहिरीत पडलेल्या महिलेला अग्निशमन दलाकडून जीवदान
अमरावती, 12 जून (हिं.स.)। महाजनपुरा भातकुली रोडवरील पंचीबाई यांच्या वाडीत विहिरीत पडलेल्या एका महिलेचा अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तत्परतेने बचाव करून तिचा जीव वाचविला. ही घटना शुक्रवारी (१२ जून) सकाळी घडली. अमरावती पोलीस कंट्रोल रूमकड
विहिरीत पडलेल्या महिलेला अग्निशमन दलाकडून जीवदान


अमरावती, 12 जून (हिं.स.)। महाजनपुरा भातकुली रोडवरील पंचीबाई यांच्या वाडीत विहिरीत पडलेल्या एका महिलेचा अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तत्परतेने बचाव करून तिचा जीव वाचविला. ही घटना शुक्रवारी (१२ जून) सकाळी घडली.

अमरावती पोलीस कंट्रोल रूमकडून सकाळी ६.४५ वाजता अग्निशमन मुख्यालयाला एका महिला विहिरीत पडल्याची माहिती मिळाली. अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे यांच्या आदेशानुसार फायर लॉरी (एमएच २७ बीएक्स ७८०३) तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. वाहन चालक निलेश आजणे, संजय चव्हाण तसेच फायरमन मनीष उताणे, राहुल घोडे, अमोल निस्ताने व मोहम्मद ताहीर यांनी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.

विहिरीभोवती मोठी गर्दी जमलेली असताना जवानांनी रोप लॅडरच्या साहाय्याने विहिरीत उतरून महिलेच्या कमरेला दोर बांधला आणि सुरक्षितपणे तिला वर काढले. बचाव करण्यात आलेल्या महिलेचे नाव आशा सुरेश दुधे (वय ५८, रा. कांचन विहार, गडगडेश्वर मंदिर परिसर) असे आहे.

बचावानंतर त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर दुखापत झाली नसून पुढील तपास पोलीस करत आहेत. अग्निशमन दलाच्या तत्परतेचे नागरिकांनी कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande