
अमरावती, 12 जून (हिं.स.) | अमरावती विधान परीषद निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने रंगायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एक वेगळेच आणि धक्कादायत वादंग अमरावतीच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाले. या घडोमोडीवर गरमागरम चर्चा सुरु असताना शनिवारी सायंकाळी अमरावतीच्या राजकारणात आणखी एक धमाका झाला. अमरावती शहराच्या नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात दोन कट्टर वैरी म्हणून ओळख असलेले दोन नेते अर्थात माजी मंत्री प्रवीण पोटे आणि आ. रवि राणा यांचे मनोमिलन झाले.
भाजपचे राज्यसभेचे खा. डॉ. अनिल बोंडे हे या संपूर्ण मनोमिलन महानाट्यात संकटमोचक ठरले, हे विशेष. या दोन कट्टर राजकीय वैरी असलेल्या दोन नेत्यांचे मनोमिलन झाल्याने आता अमरावती विधानपरीषद निवडणूक वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. भाजपने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेले माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी आपला प्रचार तीव्र केला आहे. ते महायुतीमधील नेत्यांच्या घरी नियमितपणे भेटी देऊन आदरणीय ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेत आहेत. तसेच त्यांचे स्वागत करीत आहे. याच मालिके दरम्यान, गुरुवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजता प्रवीण पोटे यांनी शंकर नगर रोडवरील आ. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन आमदार रवी राणा यांची भेट घेतली.
त्यांनी उपस्थित युवा स्वाभिमान नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतचर्चा केली. विशेष म्हणजे प्रवीण पोटे हे कार्यालयातपोहोचताच दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार केला. त्यानंतर प्रवीण पोटे यांनी शाल देवून स्वागत केले. तर सुनिल राणा यांनी सुद्धा प्रवीण पोटे यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी सर्वात महत्वाची बाब म्हणून राज्यसभेचे भाजचे खा. डॉ. अनिल बोंडे यांनी मध्यस्ती करून संकटमोचक म्हणून भूमिका बजावली हे विशेष. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास वर्तमान राजकीय स्थिती व निवडणुकीवर अर्धा तास चर्चा झाली. यावेळी प्रवीण पोटे, आ. रवि राणा यांच्याशिवाय सुनिल राणा, उपमहापौर सचिन भेंडे आदी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना प्रवीण पोटे यांनी सांगितले की, ते महायुतीमधील सर्व ज्येष्ठ नेत्यांना नियमितपणे भेटत असतात. आमदार रवी राणा हे महायुतीच्या घटक पक्षाचे एक प्रमुख नेते असल्यामुळेच त्यांनी त्यांची भेट घेतली. आमदार रवी राणा यांनी या भेटीला महायुतीच्या आहे. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार अमरावतीमध्ये महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे यांना एकतर्फी विजय मिळवून देण्याचे निर्देश मिळाले आहे. परिणामी, पोटे हे महायुती आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत, असे आ. राणांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी