घरवापसीसाठी कार्यकर्ता म्हणूनच काम करण्याची संधी मिळेल - काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे
डोंबिवली, 12 जून (हिं.स.)। राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय काँग्रेस पक्षात घरवापीसीसाठी बोलणी चालल्याचा वार्ता होत आहेत. स्थानिक पातळीवरसुद्धा कोणाला पुन्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात यावे असे वाटत असेल तर त्यांना नक्की संधी आहे, पण त्यांनी पुन्हा का
Ph1


डोंबिवली, 12 जून (हिं.स.)।

राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय काँग्रेस पक्षात घरवापीसीसाठी बोलणी चालल्याचा वार्ता होत आहेत. स्थानिक पातळीवरसुद्धा कोणाला पुन्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात यावे असे वाटत असेल तर त्यांना नक्की संधी आहे, पण त्यांनी पुन्हा कार्यकर्ता म्हणून स्वतःची विश्वनियता दाखवावी लागेल असे स्पष्ट वक्तव्य डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांनी केले. नुकताच डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदभार घेतल्यानंतर प्रथमच ते पत्रकारांशी बोलत होते.

डोंबिवली शहराच्या विकासाशी निगडित महत्त्वाचे प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा, शहराच्या गरजा आणि आगामी पक्ष बांधणीसंदर्भात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डोंबिवली जिल्हाअध्यक्ष अमित म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते मामा पगारे, एकनाथ म्हात्रे व वर्षा शिखरे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी म्हात्रे पुढे म्हणाले, कल्याण डोंबिवलीत भाजपा शिवसेना सत्ता असूनही हेचं पक्ष आंदोलन करत आहेत. जनतेला सर्व माहित आहे कि सत्ताधारी आंदोलनात का उतरत आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लवकरच मजबूत होईल. आपण पाहिले असेल कि कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी फेरीवाल्यांकडून सामान खरेदी करत होते. मग महापौर यांनी आपली नक्की भूमिका काय ते स्पष्ट करावे. फेरीवाले हटवावे कि तिकडेच राहावे हेही सांगावे. सत्ताधारी पक्ष आंदोलन करत आहेत. निळजे येथील फेरीवाला विरोधात शिवसेने आंदोलन केले. तर कल्याण येथे याच पक्षातील महापौर फेरीवाल्यांकडून सामान घेतानाची बातमी येते. मग महापौर यांनी फेरीवाल्यांबाबत भूमिका स्पष्ट करावी.

कल्याण डोंबिवलीतील परिवहन बसेस, कचरा प्रश्न यावरही प्रकाश टाकत काँग्रेस डोंबिवली जिल्हाअध्यक्ष अमित म्हात्रे यांनी सत्ताधारी शिवसेना व भाजपचे नाव न घेता टीका केली. काँग्रेस पक्षातून पदाधिकारी व कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले याबाबत म्हात्रे म्हणाले गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे. पण काँग्रेस पक्षाच्या संपर्कातही दुसऱ्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत यासंदर्भात काँगेस पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी निर्णय घेतील.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande