फरहान अख्तर नवीन कथेसह मोठ्या पडद्यावर परतणार
मुंबई, 12 जून (हिं.स.)। बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तर लवकरच एका नवीन आणि आव्हानात्मक भूमिकेतून मोठ्या पडद्यावर परतण्याची शक्यता आहे. दिग्गज संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात (बायोपिक) मुख्य भूमिका साकारण्यास
फरहान अख्तर एका नवीन कथेसह मोठ्या पडद्यावर परतणार


मुंबई, 12 जून (हिं.स.)। बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तर लवकरच एका नवीन आणि आव्हानात्मक भूमिकेतून मोठ्या पडद्यावर परतण्याची शक्यता आहे. दिग्गज संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात (बायोपिक) मुख्य भूमिका साकारण्यासाठी फरहान तयारी करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे करणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२६ च्या अखेरीस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होऊ शकते. फरहान या भूमिकेसाठी अत्यंत उत्सुक असल्याचे समजते आणि तो आर. डी. बर्मन यांचे जीवन व संगीत समजून घेण्यात पूर्णपणे मग्न झाला आहे.

भारतीय संगीतातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेल्या आर. डी. बर्मन यांचा वारसा मोठ्या पडद्यावर आदराने मांडणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे. निर्मात्यांनी त्यांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांचे हक्क मिळवले असून, त्यांची अद्वितीय संगीत शैली आणि व्यक्तिमत्त्व यथार्थपणे सादर करण्यासाठी तयारी सुरू आहे. दिग्दर्शक नीरज पांडे आणि निर्माते कमल जैन हा बायोपिक प्रेरणादायी आणि भावपूर्ण पद्धतीने सादर करण्याच्या विचारात आहेत, ज्यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीतावर आर. डी. बर्मन यांनी टाकलेल्या महत्त्वपूर्ण प्रभावावर प्रकाश टाकला जाईल.

दरम्यान, फरहान अख्तरचा 'डॉन ३' हा चित्रपटही चर्चेत आहे. वृत्तानुसार, 'क्रिएटिव्ह मतभेदां'मुळे अभिनेता रणवीर सिंग या प्रकल्पातून बाहेर पडला आहे, ज्यामुळे या चित्रपटाच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. तसेच, एक्सेल एंटरटेनमेंटने रणवीर सिंगकडून ४५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितल्याचेही समजते. 'डॉन ३' बाबत प्रश्नचिन्ह कायम असले तरी, आर. डी. बर्मन यांच्यावरील बायोपिक हा फरहान अख्तरचा पुढील मोठा प्रकल्प म्हणून चर्चेत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande