छ. संभाजीनगर : शिक्षकाच्या मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल
अंबादास दानवे यांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांची कारवाई छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.) : वेरूळ परिसरातील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आंदोलनानंतर अखेर खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करण्याच्य
अ


अंबादास दानवे यांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांची कारवाई

छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.) : वेरूळ परिसरातील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आंदोलनानंतर अखेर खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी चक्का जाम आंदोलन छेडले होते. या आंदोलनात आमदार अंबादास दानवे सहभागी झाले होते. बोरसे यांनी रस्त्यावर सुरू असलेल्या घटनेबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना मारहाण झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दानवे यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande