फिफा विश्वचषक २०२६: अमेरिकेकडून पॅराग्वेचा ४-१ ने धुव्वा, फोलारिन विजयाचा शिल्पकार
कॅलिफोर्निया, १३ जून (हिं.स.)अमेरिकेने फिफा विश्वचषक सामन्यात पॅराग्वेला ४-१ ने पराभूत करून विजयी सुरुवात केली. कॅलिफोर्नियातील सोफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्ट्रायकर फोलारिन बालोगुनने दोन गोल केले. अमेरिकेने सामन्याच्या सुरुवाती
अमेरिकेचा फुटबॉल संघ


कॅलिफोर्निया, १३ जून (हिं.स.)अमेरिकेने फिफा विश्वचषक सामन्यात पॅराग्वेला ४-१ ने पराभूत करून विजयी सुरुवात केली. कॅलिफोर्नियातील सोफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्ट्रायकर फोलारिन बालोगुनने दोन गोल केले.

अमेरिकेने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला आणि सातव्या मिनिटाला आघाडी घेतली. पॅराग्वेचा मिडफिल्डर डॅमियन बोबाडिलाने चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात चुकून आत्मघाती गोल केला, ज्यामुळे अमेरिकेला सुरुवातीलाच आघाडी मिळाली.पहिल्या गोलानंतर अमेरिकेने सतत दबाव कायम ठेवला. अमेरिकेच्या आक्रमणांपुढे पॅराग्वेचा बचाव ढासळताना दिसत होता आणि याचा फायदा घेत फोलारिन बालोगुनने पहिल्या हाफमध्ये दोन गोल करून अमेरिकेला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.प्रशिक्षक मॉरिसिओ पोचेटिनो यांनी दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला यूएसएचा स्टार खेळाडू ख्रिश्चन पुलिसिकला विश्रांती दिली. त्यानंतर संघाला आणखी गोल करता आले नाहीत, पण त्यांनी सामन्यावर नियंत्रण कायम ठेवले.

पराग्वेसाठी, बदली फुटबॉलपटू मॉरिसिओने ७४ व्या मिनिटाला गोल करून पिछाडी कमी केली, पण संघाला पुनरागमन करता आले नाही. सामन्याच्या शेवटच्या क्षणी जिओव्हानी रेनाने चौथा गोल करून यूएसएचा ४-१ असा विजय निश्चित केला. या विजयामुळे अमेरिकेने तात्पुरते 'गट डी' मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. या गटातील दुसरा सामना आता तुर्की आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande