परभणी - 20 जून पासून जिल्हास्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धा व राज्य निवड चाचणीचे आयोजन
परभणी, 12 जून (हिं.स.) महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आणि परभणी जिल्हा शटल बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धा तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणीचे आयोजन 20 जूनपासून करण्यात आले आहे.

जिल्हा शटल बॅडमिंटन हॉल येथे होणार्या या स्पर्धांमध्ये सर्व वयोगटांतील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. स्पर्धा 9, 11, 13, 15, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली तसेच खुल्या गटातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र खेळाडूंची निवड या चाचणीद्वारे करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील बॅडमिंटनपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष विजय जामकर, उपाध्यक्ष सचिन अंबिलवादे, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष सुधीर मांगुळकर, सहसचिव आशिष शहा तसेच प्रशिक्षक उन्मेष गाडेकर यांनी केले आहे. स्पर्धेसाठी प्रवेश नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून 14 जून रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी व प्रवेश नोंदणीसाठी इच्छुक खेळाडूंनी जिल्हा बॅडमिंटन हॉल येथे प्रशिक्षक उन्मेष गाडेकर (8623935679) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

 rajesh pande