रोहित पवारांच्या आंदोलनाला युवा शेतकरी रविराज साबळे पाटील यांचा जाहीर पाठिंबा
सोलापूर, 14 जून (हिं.स.)। शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन करून उत्पन्नवाढीसाठी सातत्याने कार्य करणारे आणि सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असलेले युवा शेतकरी रविराज साबळे पाटील यांनी पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट
gfd


सोलापूर, 14 जून (हिं.स.)।

शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन करून उत्पन्नवाढीसाठी सातत्याने कार्य करणारे आणि सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असलेले युवा शेतकरी रविराज साबळे पाटील यांनी पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना रविराज साबळे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी विनाअट सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची सरकारने त्वरित दखल घ्यावी. अन्यथा राज्यभरातील शेतकरी मंत्रालयाच्या दारावर धडक मारण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ आश्वासनांच्या माध्यमातून न पाहता प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नमूद करत कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्काचा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने संवेदनशीलतेने निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

रविराज साबळे पाटील यांच्या या भूमिकेमुळे आंदोलनाला आणखी बळ मिळाल्याची भावना उपस्थित शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande