
चंद्रपूर, 15 जून (हिं.स.)।
समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेच्या गंभीर समस्येवर भाष्य करणारा तुफान एक नशा हा चित्रपट चंद्रपूरच्या कलाकारांनी साकारला आहे. भारतीय जनता पक्षाच्या महानगर कार्यालयात या कलाकरांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सोबतच सदर चित्रपटाचे प्रोमो स्क्रीनिंग करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, मनोरंजनासोबतच समाजाला सकारात्मक दिशा देणारे आणि जनजागृती घडवून आणणारे चित्रपट ही आजच्या काळाची गरज आहे. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी कला आणि चित्रपट क्षेत्र प्रभावी माध्यम ठरू शकते. युवकांना योग्य संदेश देणार्या अशा आशयघन कलाकृतींमधून समाजपरिवर्तनाची चळवळ अधिक बळकट होईल असे सांगितले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते चित्रपटाशी संबंधित कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव