रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी एमसीव्हीसी विभागात थेट प्रवेश सुरू
रत्नागिरी, 14 जून (हिं.स.) । येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात (गोगटे जोगळेकर महाविद्यालय) एमसीव्हीसीच्या अभ्यासक्रमांसाठी गुणवत्तेनुसार थेट प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पारंपरिक कला, वाणिज्य आणि विज्ञ
रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी एमसीव्हीसी विभागात थेट प्रवेश सुरू


रत्नागिरी, 14 जून (हिं.स.) । येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात (गोगटे जोगळेकर महाविद्यालय) एमसीव्हीसीच्या अभ्यासक्रमांसाठी गुणवत्तेनुसार थेट प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

पारंपरिक कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसोबतच आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्याधारित व व्यवसायाभिमुख शिक्षणाला विशेष महत्त्व आले आहे. रोजगार व स्व-उद्योजकतेच्या संधी लक्षात घेता, योग्य शाखेची निवड करणे पालक व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात गेली ३० वर्षे व्होकेशनल (MCVC) अभ्यासक्रम यशस्वीरीत्या राबवत आहे. सातत्याने १५ वर्षे कोकण विभागात कनिष्ठ महाविद्यालयाचा हा विभाग अव्वल असून १०० टक्के निकालाची परंपरा विभागाने जपली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रम असे -

वाणिज्य गट - 1 Accounting and Office Management (यामध्येअकौंटिंग, कॉस्टिंग, ऑडिटिंग आणि ऑफिस मॅनेजमेंट शिकवले जाते.) 2 लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेन्ट (व्यवसाय क्षेत्रातील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर लॉजिस्टिक ॲंड सप्लाय चेन मॅनेजमेंट अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आधुनिक उद्योग क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध करून देतो.) या दोन्ही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर B.Com, LLB, BMS, BBA Accountng Finannce अशा अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो.

पॅरामेडिकल ग्रुप - Medical Laboratary Technology (यात विद्यार्थ्यांना ॲनाटॉमी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री यांसारख्या विषयांचे प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाते आणि उपवैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या संधी निर्माण केल्या जातात.)

इंजिनीअरिंग ग्रुप - इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन सिस्टीम्स यामध्ये कौशल्य विकसित करून विद्यार्थ्यांना नोकरी व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविले जाते.

या प्रत्येक अभ्यासक्रमाला उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध आहे.

बारावी परीक्षेच्या मंडळाच्या प्रमाणपत्राबरोबरच व्होकेशनल बोर्डचे प्रमाणपत्र मिळते. ६० टक्के प्रात्यक्षिक कौशल्याधारित शिक्षण, प्रत्येक गटात मर्यादित ३० विद्यार्थी, ऑन जॉब ट्रेनिंग व औद्योगिक प्रक्षेत्रभेट तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शासकीय ॲप्रेंटिसशिप योजना, शासकीय फी सवलत व इतर सर्व लाभ विद्यार्थ्यांना दिले जातात.

या अभ्यासक्रमांचे प्रवेश थेट महाविद्यालयात सुरू असून कॉलेजच्या https://www.akjcrtn.ac.in/ या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी प्रा. श्रीकांत दुदगीकर (8208668865), प्रा. योगेशानंद हळबे (9890827006), प्रा. रिद्धी हजारे (9130634394), प्रा. गायत्री पवार (9423290084), प्रा. स्नेहा पेवेकर (83299 23324) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande