जन्म प्रमाणपत्रासाठी सोलापूरातील नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या - उपमहापौर
सोलापूर, 14 जून (हिं.स.)। शाळा प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्याने जन्म प्रमाणपत्रासाठी वाढणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाला भेट देत कामकाजाचा आढावा
जन्म प्रमाणपत्रासाठी सोलापूरातील नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या - उपमहापौर


सोलापूर, 14 जून (हिं.स.)। शाळा प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्याने जन्म प्रमाणपत्रासाठी वाढणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाला भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवक किसन जाधव, स्वीकृत नगरसेवक मेटरे, मंडल अध्यक्ष महेश देवकर, शिवराज गायकवाड आदी उपस्थित होते. भेटीदरम्यान उपमहापौर देवकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून कार्यालयातील सुविधा, नागरिकांना येणाऱ्या अडचणी तसेच उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेतली.

शाळा प्रवेशाच्या काळात जन्म प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांच्या अर्जांचा वेळेत निपटारा व्हावा आणि सेवा अधिक जलद व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांना विनाविलंब सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून शाळा प्रवेशाच्या कालावधीत अधिक समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधांच्या माध्यमातून नागरिकांना तत्पर सेवा देण्यावर भर द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. शाळा प्रवेशासाठी आवश्यक असलेले जन्म प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध व्हावे आणि नागरिकांची गैरसोय टाळावी, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी यावेळी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande