मंगळवेढ्यात १०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खताचा साठा जप्त
सोलापूर, 14 जून (हिं.स.)। मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथे कृषी विभागाने केलेल्या धाडीत खताच्या नावाखाली मिठाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत सुमारे १० लाख ४६ हजार ७८० रुपयांच्या भेसळयुक्त रासायनिक खतांचा साठा आढळू
grdf


सोलापूर, 14 जून (हिं.स.)।

मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथे कृषी विभागाने केलेल्या धाडीत खताच्या नावाखाली मिठाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत सुमारे १० लाख ४६ हजार ७८० रुपयांच्या भेसळयुक्त रासायनिक खतांचा साठा आढळून आला असून संबंधित दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर जिल्हा कृषी अधिकारी व मंगळवेढा कृषी विभागाच्या पथकाने पाठखळ येथील मे. प्रहार उद्योग समूह व कृषी केंद्राच्या दुकान व गोदामावर छापा टाकला. तपासादरम्यान खत म्हणून मिठाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच भेसळयुक्त रासायनिक खतांचा साठा करून त्याची विक्री केल्याचेही उघड झाले.

कारवाईदरम्यान संबंधितांकडे खत विक्रीसंदर्भातील बिले व आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, ती सादर करण्यात संबंधितांना अपयश आले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सतीश मनोहर भोसले (रा. पाठखळ) व रविराज शंकर कणसे (रा. सातारा) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande