प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न !
छत्रपती संभाजीनगर, 15 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या लोकप्रतिनिधी व मतदारांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या
अ


छत्रपती संभाजीनगर, 15 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या लोकप्रतिनिधी व मतदारांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीकरण, समन्वय आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मतदारसंघातील विकासकामे, जनसंपर्क आणि पुढील नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी महायुतीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत सर्वांनी एकजुटीने कार्य करून महायुतीची ताकद अधिक सक्षम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande