छ. संभाजीनगर-कृषीमंत्र्यांशी दूरध्वनीवर चर्चा.. खत मिळवण्यासाठी ऑनलाइनची अट शिथिल करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर, 15 जून (हिं.स.)खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना युरिया आणि इतर खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. शासनाने खत वाटप प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक शे
Q


छत्रपती संभाजीनगर, 15 जून (हिं.स.)खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना युरिया आणि इतर खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. शासनाने खत वाटप प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना या नव्या प्रक्रियेची पूर्ण माहिती नसल्याने तसेच तांत्रिक अडचणींमुळे खत घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत..

ई-पॉस प्रणालीमध्ये सर्व्हरच्या समस्या, नेटवर्कची अडचण आणि यंत्रणा व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खत मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. वेळेत खत उपलब्ध न झाल्यास त्याचा थेट परिणाम पिकांवर होण्याची शक्यता आहे..

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, विभागीय कृषी संचालक आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन जिल्ह्यात युरिया व इतर खतांचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच ऑनलाइन प्रक्रियेसोबत तात्पुरत्या स्वरूपात ऑफलाइन अर्ज स्वीकारून शेतकऱ्यांना खत वितरण करण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली..

यासोबतच कृषिमंत्री ना.श्री.दत्तामामा भरणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांच्या अडचणी निदर्शनास आणून देण्यात आल्या. या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरच योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले..

शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय वेळेत आणि शासकीय दरात खत उपलब्ध व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून शेतकरी बांधवांच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande