
बीड, 15 जून (हिं.स.)।
लातूर-बीड-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ .रमेश आडसकर यांच्या निवासस्थानी आयोजित संवाद बैठकीस आमदार सुरेश धस यांनी उपस्थित राहून स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. संपन्न झालेल्या या बैठकीसाठी दिवसभराचा प्रचार, बैठका आणि दौरे पूर्ण झाल्यानंतरही महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नव्हता.
उशिराची वेळ असूनही उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजयाचा आत्मविश्वास आणि महायुतीच्या उमेदवाराला विक्रमी मतांनी विजयी करण्याची जिद्द स्पष्टपणे दिसत होती. आगामी निवडणुकीची रणनीती, स्थानिक प्रश्न आणि मतदारांपर्यंत विकासाची भूमिका अधिक प्रभावीपणे कशी पोहोचवायची याबाबत सविस्तर चर्चा झाली. या संवादातून महायुतीची ताकद, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि विजयासाठीची तयारी अधिक दृढ झाल्याचे जाणवले.
सदरील बैठकीला आमदार मा. अभिमन्यू पवार, मा. रमेश आडसकर, मा. शंकर देशमुख (भाजप जिल्हाध्यक्ष), मा. अंकुश इंगळे (सभापती कृ.उ.बा.स केज), मा. अमर पाटील (तालुका अध्यक्ष रा. काँ. पार्टी), मा. शिवदास थळकरी (युवक तालुका अध्यक्ष, रा. काँ. पार्टी), मा. सीताताई बनसोड (नगराध्यक्ष, केज), मा. राजू इमामदार (गटनेते, केज), मा. जलालोद्दीन इनामदार (नगरसेवक केज), मा. अझर इनामदार (नगरसेवक, केज), मा. अरुण गुंड (नगरसेवक, केज), मा. शकुंतला अंधारे (नगरसेविका, केज), मा. आशाबाई कराड (नगरसेविका, केज), मा. तरमीन बेगम इनामदार (नगरसेविका, केज), मा. पदमीन बाई शिंदे (नगरसेविका, केज), मा. कैलास पाटिल, ॲड. गणेश स्वामी, रवी गलांडे, काका बावले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis