
अमरावती, 15 जून (हिं.स.)।
राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस मंगळवार, १६ जून रोजी अमरावतीला येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्यासाठी समर्थन मिळवण्याच्या उद्देशाने हा दौरा महत्वाचा मानल्या जात आहे.सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती दौरा विधान परीषद निवडणुकीच्या दोन दिवस आधी, मंगळवार, १६ जून रोजी नियोजित आहे. या दौऱ्यात ते पक्षाचे उमेदवार प्रवीण पोटे-पाटील यांच्यासाठी प्रचार करतील आणि महायुतीच्या नगरसेवकांना भेटतील. सूत्रांनी असेही सांगितले की, या दौऱ्यात मुख्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या निवडणूक मार्गातील संभाव्य अडचणी दुर करतील आणि महायुतीच्या नगरसेवकांना एकतेचा संदेश देतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी