महामार्गालगत विहिरींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर !
बीड, 15 जून (हिं.स.)। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गांवर तब्बल ५४ अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) स्थळे असताना, रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न गंभीर बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,जिल्हा प्रशासन व वाहतूक विभागाच्या दुर्ल
अ


बीड, 15 जून (हिं.स.)।

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गांवर तब्बल ५४ अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) स्थळे असताना, रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न गंभीर बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,जिल्हा प्रशासन व वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे या विहिरी संभाव्य अपघातांचे मोठे कारण ठरत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी जवळ देवदर्शनाहुन परतणारे पिक अप रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळले यात १४ जणांपैकी ५ महिला व एका ६ महिन्याचा बाळासह ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेचा दाखला देत यापुर्वीही नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने कार थेट विहिरीत कोसळुन या भिषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून यात ७ लहान बालकांचा समावेश होता. या दुर्दैवी घटनेनंतर सुद्धा प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही.

“अशीच दुर्दैवी घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे काय?” असा संतप्त सवाल डॉ . गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी उपस्थित केला आहे.

-----------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande