फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी!
छत्रपती संभाजीनगर, 15 जून (हिं.स.)। मतदारसंघातील अनेक शेतकरी बांधवांनी रोजगार हमी योजनांतर्गत निर्माण झालेल्या सिंचन विहिरी व बोअरवेल बांधल्या आहेत. मात्र या विहिरींची नोंद ७/१२ उताऱ्यावर नसल्यामुळे शेतकऱ्यांना सोलर पंप कनेक्शनसाठी अर्ज करता येत न
Q


छत्रपती संभाजीनगर, 15 जून (हिं.स.)।

मतदारसंघातील अनेक शेतकरी बांधवांनी रोजगार हमी योजनांतर्गत निर्माण झालेल्या सिंचन विहिरी व बोअरवेल बांधल्या आहेत. मात्र या विहिरींची नोंद ७/१२ उताऱ्यावर नसल्यामुळे शेतकऱ्यांना सोलर पंप कनेक्शनसाठी अर्ज करता येत नव्हता आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसारख्या महत्त्वाच्या योजनेचा लाभही घेता येत नव्हता..

या संदर्भात आपण तहसील कार्यालय व पंचायत समिती यांच्याकडे या विषयावर पाठपुरावा केला. त्याला आता यश आले असून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

या निर्णयाचा फायदा मतदारसंघातील तब्बल २,७४० शेतकरी बांधवांना थेट होणार आहे. ७/१२ वर नोंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेता येईल, सोलर पंप कनेक्शनसाठी अर्ज करता येईल आणि वीज बिलाचा भारही कमी होईल.

त्याचबरोबर ५०० डीपीची मागणी कमी होणार असल्याने विद्युत रोहित्रावरील अतिरिक्त दाब कमी होऊन वीज पुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande