सीबीएसईच्या रिव्हॅल्युएशन पोर्टलवर सायबर हल्ल्यांचा मारा; 15 लाखांहून अधिक हिट्सची नोंद
नवी दिल्ली , 02 जून (हिं.स.)।सीबीएसईच्या रिव्हॅल्युएशन (पुनर्मूल्यांकन) पोर्टलशी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सीबीएसईने सांगितले आहे की, रिव्हॅल्युएशन पोर्टलवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले करण्यात आले. ही माहिती सीबीएसईने स्वतःच्या एक्
सीबीएसईच्या रिव्हॅल्युएशन पोर्टलवर सायबर हल्ल्यांचा मारा; 15 लाखांहून अधिक हिट्सची नोंद


नवी दिल्ली , 02 जून (हिं.स.)।सीबीएसईच्या रिव्हॅल्युएशन (पुनर्मूल्यांकन) पोर्टलशी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सीबीएसईने सांगितले आहे की, रिव्हॅल्युएशन पोर्टलवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले करण्यात आले. ही माहिती सीबीएसईने स्वतःच्या एक्स हँडलवर पोस्ट करून दिली आहे.

सीबीएसईने म्हटले की, आमच्या सायबर सुरक्षा पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या सीबीएसई रिव्हॅल्युएशन पोर्टलवर 8,000 हून अधिक वापरकर्ते एकाच वेळी कार्यरत आहेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंत 16,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या आपले अर्ज सादर केले आहेत.बोर्डाने पुढे सांगितले की, आज हजारो विद्यार्थ्यांनी रिव्हॅल्युएशन पोर्टलचा वापर केला. मात्र काही दुष्ट प्रवृत्तीच्या घटकांनी सायबर हल्ल्यांचा मारा करून सेवा विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. सीबीएसईच्या माहितीनुसार, केवळ दोन मिनिटांत पोर्टलवर 15 लाखांहून अधिक हिट्स आल्या, तसेच अनधिकृतरीत्या फाइल्समध्ये प्रवेश मिळवण्याचे 1 लाखांहून अधिक प्रयत्न करण्यात आले.

विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे, प्लॅटफॉर्ममध्ये आणखी सुधारणा करण्यात येत असून, सत्राची (सेशन) कालमर्यादा वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर होईल. सीबीएसईने स्पष्ट केले की, आमची पथके पूर्णपणे सतर्क असून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.

सीबीएसई इयत्ता 12 वीच्या पुनर्मूल्यांकन/पडताळणी प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी (फोटोकॉपीसाठी) अर्ज केला आहे, तेच गुणांच्या पडताळणीसाठी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. अर्जदारांनी संबंधित विषयाची गुणांकन योजना (मार्किंग स्कीम) पाहणे आवश्यक आहे. ही योजना प्रश्नपत्रिकेसह सीबीएसईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सर्व अर्जांची स्थिती ऑनलाइन अपलोड केली जाईल आणि ती उमेदवारांच्या लॉगिन खात्यामध्ये उपलब्ध करून दिली जाईल. गुणांमध्ये एक गुणाची कपात झाल्यास ती देखील लागू राहील.पुनर्मूल्यांकनाचा जो निकाल जाहीर केला जाईल तो अंतिम मानला जाईल. पुनर्मूल्यांकनाच्या निकालाविरोधात कोणतीही अपील किंवा पुनरावलोकनाची मागणी स्वीकारली जाणार नाही. बोर्डाने दिलेले अंतिम गुण उमेदवारांसाठी बंधनकारक असतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande