तेलंगणा स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांसह मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 2 जून (हिं.स.) : तेलंगणा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री तसेच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तेलंगणातील जनतेला शुभेच्छा देत राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निरंतर विकासासाठी सदिच्छा व्यक
PM Presidete telangana statehood


नवी दिल्ली, 2 जून (हिं.स.) : तेलंगणा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री तसेच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तेलंगणातील जनतेला शुभेच्छा देत राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निरंतर विकासासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेलंगणाच्या जनतेचे अभिनंदन करत राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि मेहनती नागरिकांचे कौतुक केले. तेलंगणाने नवनिर्मिती आणि विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधल्याचे त्यांनी नमूद केले.

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी तेलंगणाच्या सांस्कृतिक परंपरा, सर्जनशीलता आणि लोकांच्या चिकाटीचे कौतुक करत विकसित भारताच्या निर्मितीत राज्याचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा स्थापना दिनाच्या शुभेच्छा देताना राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध संस्कृतीचा उल्लेख केला. तेलंगणाच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्णतः कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तेलंगणातील जनतेच्या उत्तम आरोग्य, आनंद आणि यशासाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तेलंगणाचे वर्णन अद्वितीय सांस्कृतिक ओळख, चैतन्यमय परंपरा आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या राज्याप्रमाणे करत प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणाच्या उद्योजकतेच्या भावनेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे कौतुक केले. राज्याच्या प्रगतीमुळे देशाचा गौरव वाढत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री मनोहरलाला खट्टर, शिवराज सिंह चौहान आणि गिरीराज सिंह यांनीही तेलंगणाच्या समृद्ध वारशाचे आणि विकास प्रवासाचे कौतुक करत जनतेला शुभेच्छा दिल्या.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राज्याच्या निरंतर प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तेलंगणा स्थापना दिनाला भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा संबोधले. राज्याची निर्मिती ही लाखो लोकांच्या संघर्ष आणि त्यागाचे फलित असल्याचे त्यांनी म्हटले.

याशिवाय मोहन यादव आणि विष्णूदेव साई यांनीही तेलंगणाच्या सांस्कृतिक वारशाचे कौतुक करत राज्याच्या प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.

तेलंगणा स्थापना दिनानिमित्त देशभरातील नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून राज्याच्या विकासासाठी आणि जनकल्याणासाठी सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande