परभणी मंदिर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर
मुंबई, 20 जून (हिं.स.) - परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे हनुमान मंदिराच्या निर्माणकार्य सुरु असलेल्या छताचा भाग कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात
परभणी मंदिर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर


मुंबई, 20 जून (हिं.स.) - परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे हनुमान मंदिराच्या निर्माणकार्य सुरु असलेल्या छताचा भाग कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेतील जखमींवर उपचार केले जात आहेत. स्थानिक प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी असून मदत आणि बचावकार्य सुद्धा वेगाने सुरु आहे. मंदिरातील घटनेबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे जाहीर केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande