
पाटणा, 20 जून (हिं.स.)राजधानीतील मुसल्लापूर हाट येथील खान ग्लोबल स्टडीजमध्ये २ जूनच्या रात्री झालेल्या गोंधळ आणि गोळीबाराच्या प्रकरणात फैसल खान उर्फ खान सर यांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. शनिवारी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, पाटणा दिवाणी न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्या अटकेवरील स्थगिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जून रोजी होणार आहे. न्यायालयाने फैसल खान यांच्या तीन कर्मचाऱ्यांना अटकेपासून वाचवणारी नोटीस बजावली आहे.खान सरांच्या दोन सुरक्षा रक्षकांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, न्यायालयाने त्यांना २५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यांच्या जामिनाची सुनावणीही २५ जून रोजी होणार आहे.
सुनावणीदरम्यान, पोलिसांनी न्यायालयासमोर अद्ययावत केस डायरी सादर केली. मिळालेल्या माहितीनुसार, दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला होता, असा उल्लेख केस डायरीमध्ये आहे. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण सध्यापुरते कायम ठेवले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता एका नियोजित तारखेला होईल.
२ जूनच्या रात्री कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर झालेल्या गोंधळादरम्यान, खान सरांच्या दोन्ही सुरक्षारक्षकांनी प्रत्येकी दोन गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. तक्रारदारांचा आरोप आहे की, ही कारवाई खान सरांच्या सूचनेनुसार करण्यात आली होती. त्यानंतर, पोलिसांनी एफआयआरमध्ये फैसल खानचे नाव समाविष्ट केले. या प्रकरणात आरोपी म्हणून नाव असलेले ज्ञान बिंदू जीएस अकादमीचे संचालक रोशन आनंद यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. नंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आणि तेव्हापासून त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे