मुंबई बंदर प्राधिकरणाने गेट वे ऑफ इंडिया इथे साजरा केला 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन
मुंबई, 21 जून (हिं.स.)। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, मुंबई बंदर प्राधिकरणाच्या वतीने गेटवे ऑफ इंडिया इथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेटवे ऑफ इंडियावरील मुख्य सोहळ्यासोबतच प्राधिकरणाची सर्व कार्यालये, प्राधिकरणाच्या विविध नि
Mumbai Port Authority Celebrates 12th International Yoga Day Gateway of India


Mumbai Port Authority Celebrates 12th International Yoga Day Gateway of India


मुंबई, 21 जून (हिं.स.)। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, मुंबई बंदर प्राधिकरणाच्या वतीने गेटवे ऑफ इंडिया इथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेटवे ऑफ इंडियावरील मुख्य सोहळ्यासोबतच प्राधिकरणाची सर्व कार्यालये, प्राधिकरणाच्या विविध निवासी वसाहती, रुग्णालये, गोदी आणि मुंबई बंदरात नांगरलेल्या जहाजांवर एकाच वेळी योगाभ्यास सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ अशी यंदाच्या योग दिनाची मुख्य संकल्पना होती. वयाच्या सर्व टप्प्यांवर शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य आणि सक्रिय जीवनशैली राखण्याच्यादृष्टीने योगाभ्यासाचे महत्त्व, या संकल्पनेच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.

प्राधिकरणाच्या मुख्य सोहळ्याला केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांशी संवादही साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन ही आरोग्य आणि कल्याणासाठीची एक जागतिक चळवळ बनली असल्याचे त्यांनी नमूद केले. या निमित्ताने मुंबई बंदर प्राधिकरणाने सागरी क्षेत्रात काम करणारा संपूर्ण समुदाय, कर्मचारी, विद्यार्थी, सुरक्षा कर्मचारी आणि नागरिकांना एकत्र आणले असल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गेटवे ऑफ इंडियासह बंदर परिसर आणि मुंबई बंदरातील सुमारे 20 जहाजांवर होत असलेल्या आयोजनात नागरिकांनी नोंदवला उत्स्फूर्त सहभाग, आरोग्यदायी आणि शिस्तबद्ध जीवशैलीचा भाग म्हणून योग साधनेचा व्यापक पातळीवर अंगिकार केला जात असल्याचे द्योतक आहे, असेही सोनोवाल यांनी नमूद केले.

यावेळी कोलकाता इथल्या ऐतिहासिक रेड रोड इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणही दाखवले गेले. पंतप्रधानांचे संबोधन आणि योग सत्र अशी या कार्यक्रमाची आखणी होती. या कार्यक्रमाच्या निमीत्ताने गेटवे ऑफ इंडिया आणि मुंबई बंदर प्राधिकरणाच्या इतर ठिकाणी सहभागी झालेल्या नागरिकांनी कॉमन योग प्रोटोकॉल नुसार योगाभ्यास केला.

मुंबई बंदर प्राधिकरणाने आयोजित केलेल्या या विविध कार्यक्रमांमध्ये एकूण सुमारे 10,000 लोकांनी सहभाग नोंदवला. यापैकी गेटवे ऑफ इंडिया येथील मुख्य कार्यक्रमाला सुमारे 4,500 ते 5,000 लोक उपस्थित होते. या सहभागींमध्ये पतंजली योग समितीचे योग प्रशिक्षक, खलाशी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी, मुंबई बंदर प्राधिकरणाचे अधिकारी-कर्मचारी, जहाजबांधणी आणि सागरी क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच निमंत्रित पाहुण्यांचा समावेश होता.

यासोबतच जवाहर द्वीप, पीर प्याऊ, तेजपाल नगर इथले अग्निशमन केंद्र, माझगाव आणि कुलाबा इथल्या निवासी वसाहती, गोदी परिसरातील विविध रुग्णालये आणि मुंबई बंदरात नांगरलेल्या जहाजे आणि टग्जवर आयोजित केलेल्या योगाभ्यास सत्रांमध्ये सुमारे 5,000 नागरिक सहभागी झाले होते.

या सोहळ्याला सोनोवाल यांच्यासह केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, लोकसभेचे खासदार डॉ. निशिकांत दुबे, लोकसभेचे खासदार रवी किशन, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक नगरसेविका हर्षिता नार्वेकर आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य विवेक कोल्हे उपस्थित होते.

या सगळ्यांसोबतच मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू (भाप्रसे), उपाध्यक्ष आदेश तितरमारे (भाप्रसे), केंद्रीय जहाजबांधणी महासंचालक श्याम जगन्नाथ (भाप्रसे) तसेच अभिनेत्री ईशा देओल आणि अभिनेत्री नीतू चंद्रा या देखील या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन झाले. यानंतर उपस्थितांनी पंतप्रधानांचे भाषण आणि योगाभ्यास सत्राचे थेट प्रक्षेपण पाहीले. त्यानंतर प्रशिक्षित योग शिक्षकांनी उपस्थितांकडून कॉमन योग प्रोटोकॉलनुसार योगासने करून घेतली.

या आयोजनाच्या निमित्ताने बंदर, जहाजबांधणी आणि सागरी क्षेत्राशी संबंधित समुदाय, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि समाजातील विविध घटक योगाभ्यासाच्या माध्यमातून आरोग्य आणि कल्याणाबद्दलच्या सामायिक वचनबद्धत्तेचे पालन करण्यासाठी एकत्र आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande