व्हेनेझुएलातील भूकंपावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख; भारताकडून मदतीची तयारी
नवी दिल्ली , 25 जून (हिं.स.)।बुधवारी सायंकाळी व्हेनेझुएलामध्ये 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे दोन जोरदार भूकंप झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. याअनेक भागांतील इमारती कोसळल्या असून दळणवळण व्यवस्था विस्कळीत
व्हेनेझुएलातील भूकंपावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख ; भारताकडून मदतीची तयारी


नवी दिल्ली , 25 जून (हिं.स.)।बुधवारी सायंकाळी व्हेनेझुएलामध्ये 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे दोन जोरदार भूकंप झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. याअनेक भागांतील इमारती कोसळल्या असून दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली आहे.या भीषण भूकंपामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणातील विध्वंसानंतर जगभरातून चिंता आणि सहवेदनांची लाट उमटली आहे. भारतानेही या आपत्तीबाबत चिंता व्यक्त करत व्हेनेझुएला सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, या कठीण काळात भारत व्हेनेझुएलासोबत ठामपणे उभा असल्याचे सांगितले आहे. तसेच, आवश्यक ती प्रत्येक मदत करण्यासाठी भारत सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पंतप्रधान मोदी यांनी लिहिले, “व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या विनाशाची बातमी ऐकून मला अत्यंत दुःख झाले आहे. भारतातील जनतेच्या वतीने मी व्हेनेझुएलाच्या सरकारला आणि तेथील नागरिकांना, विशेषतः आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांना, मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. या कठीण काळात भारत प्रभावित नागरिकांसोबत खंबीरपणे उभा आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.”

व्हेनेझुएलामध्ये 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या दोन शक्तिशाली भूकंपांनी मागील 120 वर्षांतील सर्वात मोठी हानी घडवून आणली आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत किमान 32 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 700 जण जखमी झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बचाव पथके अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत. मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, प्रभावित भागांपर्यंत पोहोचण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या आपत्तीनंतर अमेरिका आणि इतर अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande