अहमदाबाद विमानतळावर मोठा अपघात टळला, एअर इंडिया-इंडिगोचे विमान आले समोरासमोर
अहमदाबाद, 25 जून (हिं.स.)बुधवारी संध्याकाळी अहमदाबाद विमानतळावर एक मोठा विमान अपघात टळला. एअर इंडिया आणि इंडिगोची दोन विमाने एकाच टॅक्सीवेवर (धावपट्टीचा एक भाग) समोरासमोर आली. मात्र, दोन्ही विमाने वेळेवर थांबवण्यात आली. इंडिगोने सांगितले की दोन्ही
Air India IndiGo flight


अहमदाबाद, 25 जून (हिं.स.)बुधवारी संध्याकाळी अहमदाबाद विमानतळावर एक मोठा विमान अपघात टळला. एअर इंडिया आणि इंडिगोची दोन विमाने एकाच टॅक्सीवेवर (धावपट्टीचा एक भाग) समोरासमोर आली. मात्र, दोन्ही विमाने वेळेवर थांबवण्यात आली. इंडिगोने सांगितले की दोन्ही विमाने सुरक्षित अंतरावर थांबवण्यात आली होती आणि प्रवासी किंवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला कोणताही धोका पोहोचला नाही.

२४ जून रोजी मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या आमच्या एआय-२४९३ या विमानाने लँडिंगनंतर टॅक्सींग करताना अनवधानाने चुकीचे वळण घेतल्याच्या घटनेची आम्हाला माहिती आहे, असे एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला कोणताही धोका पोहोचला नाही, असेही एअरलाइनने सांगितले. नंतर विमानाला टो करून त्याच्या पार्किंग बेमध्ये परत आणण्यात आले.

इंडिगो एअरलाइनने सांगितले, दोन्ही विमाने सुरक्षित अंतरावर थांबली. त्यानंतर दुसऱ्या विमानाला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली आणि आमच्या विमानाने सुरक्षितपणे उड्डाण केले व मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. इंडिगोच्या म्हणण्यानुसार, या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande