मध्यप्रदेश : कारंजा येथे स्मृती भवन गृहप्रवेश कार्यक्रम 27 जून रोजी
बालाघाट, 26 जून (हि.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पावन निमित्ताने बालासाहेब आणि भाऊराव देवरस सेवान्यास यांच्या वतीने मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कारंजा येथे बांधण्यात आलेल्या “स्मृती भवन”चे पूजन व गृहप्रवेश कार्यक्रम 2
स्मृति भवन गृह प्रवेश कार्यक्रम लोगो


बालाघाट, 26 जून (हि.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पावन निमित्ताने बालासाहेब आणि भाऊराव देवरस सेवान्यास यांच्या वतीने मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कारंजा येथे बांधण्यात आलेल्या “स्मृती भवन”चे पूजन व गृहप्रवेश कार्यक्रम 27 जून 2026, शनिवार रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

हे नवनिर्मित भवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बालासाहेब (मधुकर दत्तात्रेय) देवरस आणि त्यांचे ज्येष्ठ प्रचारक बंधू स्व. भाऊराव (मुरलीधर दत्तात्रेय) देवरस यांच्या स्मृतीला समर्पित असून, त्यांच्या पैतृक गाव कारंजा येथे सामूहिक प्रयत्नांतून उभारण्यात आले आहे.

या गरिमामय कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह आणि अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मा. सुरेश (भैयाजी जोशी) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे वेळापत्रक

सकाळी 8: वा. — वास्तु पूजन प्रारंभ

सकाळी 11: वा. — नवनिर्मित भवन प्रवेश व मुख्य मंचीय कार्यक्रम

दुपारी 12:30 वा. — सामूहिक भोजन

बालासाहेब आणि भाऊराव देवरस सेवान्यासच्या न्यासी मंडळाने या पावन प्रसंगी सर्व मान्यवर व प्रबुद्ध नागरिकांना सादर आमंत्रण दिले आहे. हा न्यास कारंजा (आमगाव जवळ, बालाघाट) येथे कार्यरत असून, कृषी प्रशिक्षण, ग्रामीण विकास, आरोग्य सेवा आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande