केंद्रीय ग्रामीण विकास मंत्र्यांच्या हस्ते रुरल इंटर्नल ऑडिट पोर्टलचे उद्घाटन
नवी दिल्ली, 28 जून (हिं.स.)। केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील पुसा कॅम्पसमध्ये आयोजित ''राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलना'' मध्ये ''रुरल इंटर्नल ऑडिट पोर्टल'' या ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टल चे उद्घाटन
Inauguration Rural Internal Audit Portal Union Rural Development Minister


नवी दिल्ली, 28 जून (हिं.स.)। केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील पुसा कॅम्पसमध्ये आयोजित 'राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलना' मध्ये 'रुरल इंटर्नल ऑडिट पोर्टल' या ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टल चे उद्घाटन केले. हे एआय-कृत्रिम बुद्धीमत्तेने युक्त सक्षम पोर्टल, ग्रामीण विकास मंत्रालयामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि तंत्रज्ञान-आधारित प्रशासनाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

पारंपरिक लेखापरीक्षण पद्धतींचे आधुनिकीकरण करण्याची आणि नव्याने उदयास येणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची गरज ओळखून, ग्रामीण विकास मंत्रालयाने 'रुरल इंटरनल ऑडिट पोर्टल' विकसित केले आहे. हे पोर्टल जोखीम-आधारित तसेच अनुपालनाधारित अंतर्गत लेखापरीक्षणाच्या संपूर्ण (एंड-टू-एंड) व्यवस्थापनासाठी विकसित करण्यात आलेले अशा प्रकारातील पहिले एकात्मिक डिजिटल व्यासपीठ आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मुख्य लेखा नियंत्रक कार्यालयाने संकल्पित केलेले आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) यांच्या सहकार्याने विकसित हे पोर्टल, मंत्रालयाच्या डिजिटल कारभाराच्या प्रवासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे.

या आव्हानांवर मात करण्यासाठी मंत्रालयाने पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि संस्थात्मक स्मृती (इन्स्टिट्यूशनल मेमरी) यांना चालना देत अंतर्गत लेखापरीक्षणाची प्रक्रिया सुलभ करणारी सर्वसमावेशक डिजिटल प्रणाली विकसित करण्यास सुरुवात केली. सध्याच्या कार्यप्रवाहांचे मॅपिंग करण्यासाठी तसेच प्रक्रियेच्या पुनर्रचनेच्या संधी ओळखण्यासाठी लेखापरीक्षक, कार्यक्रम विभाग, क्षेत्रीय कर्मचारी आणि इतर भागधारक यांच्याशी व्यापक चर्चा करण्यात आली.

रुरल इंटरनल ऑडिट पोर्टल भारत सरकारच्या डिजिटल कारभाराच्या मानकांशी सुसंगत अशा आधुनिक, विस्तारक्षम आणि सुरक्षित तंत्रज्ञान संरचनेचा वापर करून विकसित करण्यात आले आहे. मंत्रालय, या पोर्टलच्या परिसंस्थेमध्ये टप्प्याटप्प्याने एआय-सक्षम कार्यप्रणाली समाविष्ट करत आहे. या क्षमतांमुळे बुद्धिमान लेखापरीक्षण नियोजन, अधिक जोखमीच्या घटकांची ओळख, पूर्वानुमानात्मक विश्लेषण (प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स), नमुन्यांची ओळख आणि पुराव्यांवर आधारित निर्णयप्रक्रियेला चालना मिळणे अपेक्षित आहे. एआय-आधारित लेखापरीक्षण सहाय्य प्रणालीची सुरुवात ही मंत्रालयातील डिजिटल लेखापरीक्षण प्रशासनाच्या उत्क्रांतीतील पुढील टप्पा दर्शवते.

रुरल इंटरनल ऑडिट पोर्टलच्या अंमलबजावणीमुळे लेखापरीक्षण प्रशासन आणि सुशासनाच्या परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. या पोर्टलमुळे लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याच्या पद्धतींचे मानकीकरण झाले असून, विविध कार्यक्रम आणि ठिकाणांवरील लेखापरीक्षण निरीक्षणांच्या व्यवस्थापनासाठी एकसमान कार्यचौकट विकसित करण्यात आली आहे. लेखापरीक्षणाशी संबंधित नोंदी आता डिजिटल पद्धतीने जतन केल्या जात असून, त्यामुळे त्यांचा मागोवा घेणे अधिक सुलभ झाले आहे, नोंदी सहज उपलब्ध होत आहेत आणि संस्थात्मक ज्ञानाचे जतनही सुनिश्चित झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande